बीड : न्यायाधिशांच्या खासगी वाहनाला वाळूच्या गाडीचा कट; पोलिसांकडून कारवाई

file photo
file photo

गेवराई पुढारी वृत्तसेवा राक्षसभूवन शनिचे या ठिकाणी आपल्या खासगी वाहनाने एक न्यायाधिश राक्षसभूवनला दर्शनासाठी आले होते. येथील अरूंद रस्‍त्‍यावर वाळूने भरून जानाऱ्या दोन वाहनांनी न्यायाधिशांच्या गाडीला कट मारला. त्‍यानंतर या घटनेची माहिती त्‍यांनी बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर यांना दिली. पोलिस अधीक्षकांनी या दोन्ही वाहनांवर कारवाईचे आदेश चकलांबा पोलिसांना दिले. चकलांबा पोलिसांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेत कारवाई केली. दरम्‍यान एक हायवाने पलायन केले आहे. ही घटना ( दि 1 जून ) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील राक्षसभूवन परिसरात अवैध वाळूच्या तस्करीने थैमान घातले आहे. असे असताना यापुर्वी देखील एका वाळूच्या गाडीने जिल्हाधिकारी यांच्या गाडीला कट मारला होता. तसेच आज न्यायाधीश हे राक्षसभूवन शनिचे या ठिकाणी देवदर्शनासाठी आले असता त्यांच्याही गाडीला वाळू भरून चाललेल्या गाड्यांनी कट मारला.

सदर बाब ही गंभीर स्वरूपाची आहे. न्यायाधीश यांनी ही माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर यांना दिली. तसेच त्यांनी चकलांबा पोलिसांना सदरच्या गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या तिन वाळूच्या गाड्या होत्या अशी प्राथमिक माहिती आहे. परंतू दोनच गाड्या चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती असून या कारवाईत अंदाजे साठ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news