आंबे तुम्ही खा, कोई आम्हाला द्या; निसर्गप्रेमींचा जवळाबाजारमध्ये उपक्रम            

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत नसल्याने उन्हाळ्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून पावसाळ्यात परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी आंबे तुम्ही खा कोई आम्हास द्या हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

निसर्गप्रेमी मंडळीकडून पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदा तापमान ४० अंश सेल्सिअस पार करत आहे. यामुळे परिसरात वृक्षारोपण करणे काळाजी गरज आहे. पावसाळ्यात परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी रोपटे विकत घेऊन करू नका. त्याऐवजी उन्हाळ्यात नागरिक आंबे खाण्यास घरोघरी जातात. त्याची कोई कचऱ्यात न टाकता आम्हाला द्या. हा उपक्रम निसर्गप्रेमी मित्र मंडळीकडून राबवण्यात येत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबे तुम्ही खा मात्र, कोई आम्हाला द्या. हा उपक्रम आपल्यासाठी निसर्ग प्रेमी-मित्र मंडळीकडून परिसरात राबविण्यात येणार आहे. या कोईपासून रोपटे तयार करून त्याचे वृक्षारोपण पावसाळ्यात करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. निसर्गप्रेमी या उपक्रमातून परिसरात पावसाळ्यात जवळपास ५ हजार  वृक्षारोपण पावसाळ्यात करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करीत आहे. तरी, सर्वांनी आंबे खाऊन कोई आम्हास देण्याचे सहकार्य करावे असे आवाहन निसर्ग प्रेमी नंदकिशोर बाहेती, मोहन भालेराव, अक्षय मुळे, राम तरटे, धनु राऊत यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news