छ. संभाजीनगर : मुंबईच्या तरुणीवर बिडकीन येथे अत्याचार; तरुण फरार | पुढारी

छ. संभाजीनगर : मुंबईच्या तरुणीवर बिडकीन येथे अत्याचार; तरुण फरार

पैठण, पुढारी वृत्तसेवा: मुंबई येथील २३ वर्षीय तरुणीवर मारहाण करून अत्याचार करण्यात आल्याची घटना आज (दि.१७) बिडकीन येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी दीपक प्रभाकर सरोसे (रा. बिडकीन) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चेंबूर शिवसेना भवन, सह्याद्रीनगर (ब) मुंबई येथील २३ वर्षीय तरुणी खासगी नोकरीनिमित्त ह.मु बिडकीन येथील भाजी मंडई परिसरात राहत होती. दीपक सरोसे यांनी या तरुणीला मारहाण करून धमकी देऊन एका लॉजवर नेले. तेथे बलात्कार केल्याची तक्रार आज (दि.१६) पीडित तरुणीने बिडकीन पोलीस ठाण्यात दिली.

पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरूण फरार झाला असून त्याच्या शोधासाठी विशेष पथक रवाना झाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे करीत आहे.

हेही वाचा 

Back to top button