परभणी: ईंजनगाव येथून चोरलेल्या जेसीबी मशीनसह तिघांना अटक | पुढारी

परभणी: ईंजनगाव येथून चोरलेल्या जेसीबी मशीनसह तिघांना अटक

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आडगाव लासीना येथील शेतकरी अंबादास देवराव भोरे यांची जेसीबी मशीन (एम एच २२ ए एम १४४८) वसमत तालुक्यातील ईंजनगाव येथील एका शेतक-याच्या अखाड्यावरुन ३ मार्चरोजी रात्री चोरट्यांनी पळवली होती. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी (दि.१५) तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जेसीबी मशीन जप्त केली. अंबादास भोरे यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

संजय अंबादास ईंगोले (वय ३२, रा.देगाव, ता. पूर्णा) अल्लाबक्ष महेबूब पठाण (वय ३९, रा. पाथरी, जि. परभणी), युवराज उत्तम कठाळे (वय ४०, रा. दहवंडी, ता. शिरुर, जि. बीड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तसेच सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यानंतर तपासाची चक्रे गतिमान करत गोपनिय बातमीदाराकडून संशयितांची माहिती मिळाली. संशयित आरोपी संजय अंबादास ईंगोले यांने आपल्या दोन साथीदारामार्फत संगनमताने जेसीबी मशीन चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, गणेश लेकूळे, तुषार ठाकरे, दीपक पाटील, दत्ता नागरे, अशोक काकडे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा 

Back to top button