हिंगोली: परभणी, पूर्णा शहरात पाणीटंचाई: सिद्धेश्वर धरणातून २ हजार क्यूसेक | पुढारी

हिंगोली: परभणी, पूर्णा शहरात पाणीटंचाई: सिद्धेश्वर धरणातून २ हजार क्यूसेक

औंढा नागनाथ : पुढारी वृत्तसेवा: परभणी व पूर्णा शहरास पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज (दि.१२) सिद्धेश्वर मुख्य धरणातून नदी पत्रात २ हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. सिद्धेश्वर धरणाचे सहा वक्रद्वार १ फुटाने उचलून पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

परभणीसह पूर्णा शहरास सिद्धेश्वर धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी दरवर्षी पाण्याचे आरक्षण केले जाते. नदीपात्रातून पाणी सोडावे लागत असल्यामुळे नदीपात्र कोरडे असल्याने तसेच बाष्पीभवन होऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यव होतो. त्या अनुषंगाने प्रत्यक्षात लागणाऱ्या पाण्यापेक्षा दुप्पट पाणी प्रतिवर्षी आरक्षित केले जाते.

पूर्णा शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे मागणीनुसार सिद्धेश्वर धरणातून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला, याद्वारे सिद्धेश्वर जलाशयातील जवळपास ४ दलघमी पाण्याचा उपसा होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button