Manoj Jarange: गौर येथे शनिवारी मनोज जरांगे यांची संवाद बैठक | पुढारी

Manoj Jarange: गौर येथे शनिवारी मनोज जरांगे यांची संवाद बैठक

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गौर येथे जागृत देवस्थान श्री सोमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त शनिवारी (दि. २०) सायंकाळी ४ वाजता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गौर फाटा येथील भगवानराव जोगदंड यांची खारीची सुमारे ९ एकर जमीन बैठकीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. Manoj Jarange

या जागेची साफसफाई करून मैदान तयार करण्यात आले आहे. वाहनांची व्यवस्था स्वखर्चाने केली जात आहे. पूर्णा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव सढळ हाताने पिण्याचे पाणी, नाष्टा आदी जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करणार आहे. या बैठकीसाठी परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव‌ येणार असल्याचे सांगितले जात आहे. Manoj Jarange

गौर गावातील सकल मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवल्याने जरांगे- पाटील यांनी येथील संवाद बैठकीस होकार दिल्याची माहिती गौर येथील मराठा समन्वयकांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना दिली.

हेही वाचा 

Back to top button