Lok Sabha Election 2024 : जाहीर सभांसाठी मैदानांची होणार ऑनलाईन बुकिंगउमेदवार व कार्यकर्त्यांची आता दमछाक थांबणार

Lok Sabha Election 2024 : जाहीर सभांसाठी मैदानांची होणार ऑनलाईन बुकिंगउमेदवार व कार्यकर्त्यांची आता दमछाक थांबणार
Published on
Updated on


नांदेड: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या कारणांसाठी सुगम, समाधान व सुविधा हे तीन मोबाईल अ‍ॅप जारी केले आहेत. या माध्यमातून राजकीय पक्षांना जाहीर सभांसाठी सार्वजनिक ठिकाणची मैदाने, ऑनलाईन बुकिंग करता येणार आहेत. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत एकाही राजकीय पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराने जाहीर सभेसाठी मैदान बुकिंग केलेले नाही. Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीत मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या हवी ती माहिती मिळणार असल्याने उमेदवार व कायर्कर्त्यांची दमछाक थांबणार आहे. लहान मोठ्या कारणासाठी प्रत्येकवेळी निवडणूक विभागाकडे धाव घेण्याची गरज आता नाही. Lok Sabha Election 2024

या निवडणुकीत वेगवेगळ्या अ‍ॅपचा वापर सर्वसामान्य नागरिकांना देखील मोबाईलवर करता येणार आहे. यामध्ये 'सी-व्हीजील' अ‍ॅपद्वारे नागरिकांना निवडणूक निरीक्षकाची भूमिका पार पाडता येणार आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी 'समाधान' अ‍ॅपची निर्मिती केली असून एखाद्या ठिकाणी आचारसंहिता भंग होत असल्याचे आढळून आल्यास नागरिक त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतात. या तक्रारींवर 100 मिनिटांत कारवाई होणे अपेक्षित आहे.

'सुविधा' नावाचे आणखी एक अ‍ॅप आयोगाने जारी केले असून या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना वाहतूक सुविधेसह पाणी, स्वच्छता आदींची माहिती मिळविता येईल. एवढेच नव्हे, तर मतदार यादीतील क्रमांक तसेच बूथ क्रमांक उपलब्ध होणार आहेत.

राजकीय पक्ष व उमेदवारांना संजीवनी ठरेल असे 'सुगम' अ‍ॅप जारी करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून उमेदवार व राजकीय पक्षांना सार्वजनिक ठिकाणची मैदाने जाहीर सभेसाठी बुकिंग करता येणार आहेत. गुरुगोविंदसिंह स्टेडीयम, इंदिरा गांधी मैदान, नवा मोंढा मैदान, जुना मोंढा मैदान, गुरूवार बाजार मैदान सिडको, मल्टीपर्पज हायस्कूल मैदान, या शिवाय जिल्ह्यातील इतर मैदाने या अ‍ॅपच्या माध्यमातून बुकिंग करता येणार आहे. या शिवाय निवडणूक विभागात किंवा एक खिडकीत अर्ज देऊनही जुन्या पद्धतीने मैदाने बुकिंग करता येईल. जाहिरातीची ठिकाणेही या माध्यमातून बुकिंग करता येणार आहेत.

24 तासांसाठी 1 मैदान बुकिंग करावयाचे असल्यास त्यासाठी 2 हजार 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच बॅनर चार रूपये प्रति चौरस फूट प्रमाणे शुल्क आकारले जातील. मात्र, अद्यापपर्यंत मैदान, बॅनर परवानगी आणि जाहिराताची ठिकाणे यापैकी एकाचीही बुकिंग झालेली नाही.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news