

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यातील ममदापूर येथील अशोक सुंदरराव काळंबांडे (वय ४५) दुचाकी अपघातात रविवारी (दि.३१) गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला व गुप्तांगाला जबर मार लागला होता. ते बेशुध्दावस्थेत होते. परभणीतील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रविवारी (दि.३१) सकाळी सिंगणापूर-ताडकळस रोडवरील दस्तापूर शिवारातील गोलाई वळण रस्त्यावर अशोक यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला होता.
दरम्यान, मोंढा पोलीस ठाण्यात त्याच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत अशोकच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
हेही वाचा