औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील पोटा बु. येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाने 9 लाख 41 हजार 316 रुपयांचा अपहार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सरपंचाने ७ फेब्रुवारीरोजी तक्रार केली होती. औंढा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी अपहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विस्तार अधिकारी सय्यद जमीर चौकशी करणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोटा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या औंढा नागनाथ शाखेत खाते आहे. या खात्यातून ग्रामसेवकाने 9 लाख 41 हजार 316 रुपये अपहार करून स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा करून घेतले. या प्रकरणी सरपंच यांनी 7 फेब्रुवारीरोजी गटविकास अधिकारी व वरिष्ठांकडे तक्रार केली. तर ग्रामसेवकाने याप्रकरणी पुन्हा 8 फेब्रुवारीरोजी वेगळी तक्रार केली आहे.
पोटा बु. येथील ग्रामसेवकाने निधीबाबत कुठलीही संमती न घेता सरपंच, उपसरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या बँक खात्यावर लाखो रुपये वर्ग करून अपहार केला. या प्रकरणी आता गटविकास अधिकारी गोपाळ कोल्हाले यांनी ग्रामसेवकाची वस्तुनिष्ठ चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा