Manoj Jarange-Patil : लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत मनोज जरांगेंचे मोठे विधान, म्हणाले… | पुढारी

Manoj Jarange-Patil : लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत मनोज जरांगेंचे मोठे विधान, म्हणाले...

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: जालना किंवा बीडमधून आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही. माझा राजकारण हा मार्ग नाही. मी समाजाचा आदर करतो. मी निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करून माझ्यावर एसआयटी चौकशी लावाल, आमच्यावर गुन्हे दाखल करणार असाल, तर जीवन संपवलेल्या तरुणांची कुटुंबीय राज्य सरकारवर खटले दखल करतील, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला. ते अंतरवाली सराटीत आज (दि.२) पत्रकारांशी बोलत होते. Manoj Jarange-Patil

जरांगे पुढे म्हणाले की, राज्यात पोलीस जाणून बुजून तरुणांना त्रास देत आहे, बोर्ड लावलेले काढा, बैठका थांबवा, ही गृहमंत्र्यांची गुंडागर्दी सुरु आहे. माझ्या सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवून दिवसभर बसवून ठेवले जात आहे. कारण नसताना त्यांना नोटीस दिल्या जात आहेत. हा प्रकार दोन दिवसांत पोलिसांनी थांबवावा, अन्यथा प्रत्येक पोलीस ठाण्यात संपूर्ण तालुका जाऊन बसेल, असा इशारा जरांगे यांनी दिला. Manoj Jarange-Patil

गृहमंत्री फोन टॅप करत आहेत. मी कुठेही यायला तयार आहे. माझी नार्को टेस्ट करा, एसआयटी चौकशी लावली आहे. त्याला समाज उत्तर देईल. त्यांनी मला अटक करून दाखवावी. मग समजेल आंदोलनाचा टेम्पो कमी झाला की वाढला. गृहमंत्री फडणवीस महिलांच्या आडून आमच्यावर निशाणा साधत आहेत. आमच्याकडे पण महिला आहेत. त्या उत्तर देवू शकतात, असा इशारा त्यांनी दिला.

Manoj Jarange-Patil : गुणरत्न सदावर्ते देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस

गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस आहे. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच त्याने मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. निवडणूक झाल्यावर आरक्षण उडविण्याचा यांचा डाव आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत कधीच समेट होणार नाही, असेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button