हिंगोली: जवळाबाजार येथील बाजार समितीत कडकडीत बंद | पुढारी

हिंगोली: जवळाबाजार येथील बाजार समितीत कडकडीत बंद

जवळाबाजार, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये प्रस्तावित सुधारणा करण्यात येऊ नये, यासाठी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीत आज (दि.२६) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. जवळाबाजार बाजार समितीत कामकाज बंद ठेवण्यात आले. आडत बाजारपेठ व्यापाऱ्यांनीही आडत बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन पाठिंबा दिला.

महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक  ६४ अन्वये महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारण्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्यात येणार आहेत. त्या सुधारणा करण्यात येऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न संघ पुणे यांनी आज राज्यातील सर्व कृषी उत्पन्न व बाजार समितीतील कामकाज एक दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार बाजार समिती आणि आडत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button