परभणी : युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्षासह कार्यकर्त्यांचा आमदार गुट्टे मित्रमंडळात प्रवेश | पुढारी

परभणी : युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्षासह कार्यकर्त्यांचा आमदार गुट्टे मित्रमंडळात प्रवेश

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष (शरद पवार गट) कुलदीप जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली आमदार गुट्टे मित्रमंडळात आज (दि.४) दुपारी प्रवेश केला. गोदाकाठी असलेल्या धारासुर जिल्हा परिषद गटातील एक तरुण नेतृत्व म्हणून कुलदीप जाधव यांची ओळख आहे. जाधव यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आमदार गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली मित्रमंडळात जाहीर प्रवेश केला. Parbhani

यावेळी मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, किशनराव भोसले, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, गंगाखेड तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Parbhani

धारासुर येथील संदीप जाधव, प्रदीप सोळंके जवळेकर, धनंजय जाधव, राम जाधव, आकाश जाधव, संकेत जाधव, चैतन्य जाधव, उमाकांत रनबावरे, सिद्धेश्वर जाधव, ओमकार जाधव, सखाराम जाधव, ऋषिकेश जाधव, परिक्षीत जाधव, अनंता सरांडे, सुरेश जाधव, प्रद्युम्न जाधव, माऊली जाधव, कृष्णा यादव, सचिन नागठाणेकर, राम ढेबरे, राम साखरे आदीसह शेकडो तरुणांनी आ. गुट्टे मित्रमंडळामध्ये प्रवेश केला.

वापरा – फेका राजकारणाची चीड – कुलदीप जाधव

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्यांकडून सक्रिय कार्यकर्त्यांची गरजेनुसार वापरा व फेका अशी राजनीती सुरू आहे. त्यामुळे विकासाचे राजकारण करणारे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

कट्टर कार्यकर्ते सांभाळण्याची विरोधकांची कुवत नाही – आ.रत्नाकर गुट्टे

विकासाचे राजकारण करण्यापेक्षा विरोधाचे राजकारण करण्यात गुंग असलेल्या विरोधकांना आपले कट्टर कार्यकर्ते सुद्धा सांभाळण्याची कुवत राहिली नाही. मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांमुळे कार्यकर्त्यावर व जनसामान्यांवर प्रभाव होत आहे.

हेही वाचा 

Back to top button