वाशिम : देशी कट्ट्यातून गोळीबार; युवक गंभीर जखमी

देशी कट्टयातून गोळीबार
देशी कट्टयातून गोळीबार

वाशिम ; पुढारी वृत्‍तसेवा वाशिम शहरातील मन्नासिंह चौकात घरगुती वादातुन एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली. शिवम उर्फ सनी ठाकुर असे या गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिमच्या मन्नासिंह चौकात घरगुती वादातून हा गोळीबार झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

या घटनेत माजी नगर परिषद उपाध्यक्ष भानु प्रतापसिंग ठाकूर यांचा मुलगा शिवम उर्फ सनी ठाकुर याच्या पायाला मांडीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. गोळी झाडणाऱ्या संशयीत आरोपीचे नाव संग्राम उर्फ बिट्टू ठाकुर असे आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसात बिट्टू ठाकुरसह विश्वजीत ठाकुर, वाठोरे, खडसे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील सर्व संशयीत आरोपी सध्या फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास वाशीम शहर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मात्र वाशिम शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news