बीड : लग्नानंतर सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाची आत्महत्या | पुढारी

बीड : लग्नानंतर सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाची आत्महत्या

माजलगाव (जि. बीड) : पुढारी वृत्तसेवा

माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील तरुण शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना घडली. पांडुरंग रामकिसन डाके (वय २६) असे त्याचे नाव असून शनिवार (दि. २०) रोजी माजलगाव येथे त्याचा विविह सोहळा पार पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी सत्यनारायण पूजा पार पडली. सर्व कुटुंबिय आणि नववधू घरातील कामात व्यस्त होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पांडुरंग शेतात गेला आणि त्याने एका झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. त्याने आत्महत्या का केली? याचे अद्याप कारण समजू शकले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Back to top button