लातूर : मराठा आरक्षणासाठी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवले | पुढारी

लातूर : मराठा आरक्षणासाठी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

लातूर, पुढारी वृतसेवा मराठा आरक्षण अशी चिठ्ठी लिहून येथील कै. बब्रुवान विठ्ठलराव काळे (मांजरा) आयुर्वेदीक मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांने त्याच्या वसतीगृहातील खोलीत पंख्यास ग‌ळफास घेत आपले जीवन संपवले. प्रदिप निवृती मते (वय २१) असे त्याचे नाव असून, तो बीएएमएसच्या प्रथम वर्षात शिकत होता.

तो बीड जिल्ह्याकील नागापूर येथील रहिवाशी आहे. दरम्यान त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असल्याचे प्राचार्य डॉ. आनंद पवार यांनी सांगितले. लव्ह यू डॅड अशीही चिठ्ठी सापडल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button