परभणी : दस्तापूरजवळ दुचाकीस्वारांना चिरडले; २ तरुणांचा जागीच मृत्यू

परभणी : दस्तापूरजवळ दुचाकीस्वारांना चिरडले; २ तरुणांचा जागीच मृत्यू
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या जोराच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दस्तापूर गाव शिवराजवळ मंगळवारी (दि.९) रात्री ११ च्यादरम्यान झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील शिर्शी येथील भारत भाऊसाहेब वैद्य (वय३९), योगीराज भानूदास लवंदे (वय ४०) हे दोघेजण मोटारसायकलने (एम एच २२,ए आर ५२४१) ताडकळस सिंगणापूर रोडवरुन गावाकडे जात होते. यावेळी त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक देवून उडवले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कपिल शेळके, पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे शिवकांत दाखल झाले. परभणी येथील सरकारी रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले. पुढील तपास ताडकळस पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे शिर्शी गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news