हिंगोली: औंढा नागनाथ येथील सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार | पुढारी

हिंगोली: औंढा नागनाथ येथील सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. वसंतराव जगताप (वय 45) व विठ्ठल शेषराव आम्ले (वय 32, दोघे रा. औंढा नागनाथ, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे व पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. सावंत यांनी सराईत गुन्हेगारां विरुद्ध प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर हिंगोली उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सविस्तर चौकशी करून प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता. पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये गुन्हा दाखल करून या गुन्हेगारांना आजपासून पुढील एका वर्षाकरिता हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेशीत केले आहे.

हेही वाचा 

Back to top button