Manoj Jarange Patil : छगन भुजबळ हे पनवती; मनोज जरांगेंचा घणाघात | पुढारी

Manoj Jarange Patil : छगन भुजबळ हे पनवती; मनोज जरांगेंचा घणाघात

वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या पीक नुकसान पाहणी दौर्‍यास मराठा आंदोलकांनी विरोध केला. या सर्व घडामोडींवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे पनवती असून, त्यांच्यामुळे शेतकर्‍यांच्या मागे साडेसाती लागेल, अशी जोरदार टीका त्यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. ( Manoj Jarange Patil )

जरांगे म्हणाले की, प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजेत. मंत्रिपदावरील व्यक्ती शेतात जाऊन पंचनामे करते का?

माती कालवू नका; राणेंना टोला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, जनतेला माझा आरक्षणासंदर्भात अभ्यास आहे की नाही, हे माहीत आहे. राणे यांनी असे काही बोलून माती कालवण्याचा प्रयत्न करू नये. ( Manoj Jarange Patil )

Back to top button