छ. संभाजीनगर : पैठण येथे नाथसागर धरणात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको | पुढारी

छ. संभाजीनगर : पैठण येथे नाथसागर धरणात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको

पैठण, पुढारी वृत्तसेवा: येथील नाथसागर धरणात मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आज (दि.१०) पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर रोडवरील सह्याद्री चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मराठवाड्याचे हक्काचे पाणी नाथसागर धरणात सोडण्यासाठी धरणाच्यावरील भागातील काही लोक विरोध करत आहेत. याचा निषेध करून धरणात पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पीक विमा मागणीसह पैठण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. ब्रम्हणगव्हाण सिंचन योजनेतून खेर्डा प्रकल्पाला पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी संत एकनाथ शुगर मिलचे चेअरमन सचिन घायाळ, दत्तात्रय गोडे, बद्रीनारायण भुमरे, प्रल्हाद औटे, थोटे, दिनेश पारिक, चंद्रकांत झारगड, शिवाजी साबळे, अनिल घोडके, भाऊसाहेब पिसे, महादेव ठोके, आतिष गायकवाड आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक गिरजाबाई सांगळे, प्रल्हाद मुंडे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश घुगे, संजय मदने, पोलीस नाईक सचिन आगलावे, गव्हाणे, सोनवणे, राजेश आटोळे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा 

Back to top button