कौसडी, पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील खदानीमध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ८) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
गजानन रामभाऊ वायगुडेघे (वय15) व मंथन गणेश अवतारे (वय15) हे आपल्या मित्रांसोबत कौसडी शिवारातील गायरानातील खदानीमध्ये पोहायला गेले होते. गजानन वायगुडेघे मंथन अवतारे या दोघांना पाण्याचा अंदाज लागला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. खदानीच्या बाहेर असलेल्या त्यांच्या दोन मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
परंतु, जवळपास कोणीच नसल्याने त्यांना वाचवता आले नाही. बोरी पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांच्यासोबत अनिल शिंदे, शरद सावंत, अमोल शेंडगे, होमगार्ड सुदर्शन प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने बुडालेल्या दोघांचा मृतदेह बाहेर काढला. बोरी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. साखरे यांनी दोघांना मृत घोषित केले. बोरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. या घटनेमुळे कौसडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा