Nanded Government Hospital: शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ बालकांचा मृत्यू ; ७० बालके अत्यवस्थ | पुढारी

Nanded Government Hospital: शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ बालकांचा मृत्यू ; ७० बालके अत्यवस्थ

नांदेड: पुढारी वृत्तसेवा: नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मागील 24 तासांत 24 बालकांचा मृत्यू झाला आहे, तर 70 बालके अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, याबाबत प्रशासनाने अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज (दि.२) सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणाची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.  (Nanded Government Hospital)

या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णांचा जास्तीचा समावेश होता, असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा 

Back to top button