Nanded crime news: बरबडा येथे मुलाकडून आईचा दगडाने ठेचून खून

Nanded crime news: बरबडा येथे मुलाकडून आईचा दगडाने ठेचून खून
Published on
Updated on

नायगाव: पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बरबडा येथे एका महिलेची दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी ( दि.२३) सायंकाळी उघडकीस आली. गोदावरीबाई लिंगोबा वटपलवाड (वय ५५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचे पती लिंगोबा वटपालवाड यांनी रविवारी पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी कुंटुर पोलिसांनी संशयित मुलगा श्रीनिवास लिंगोबा वटपलवाड (वय २४) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Nanded crime news)

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी मुलगा व आईमध्ये नेहमी प्रमाणे वाद झाला. रागाच्या भरात मुलाने आईचा खून केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. सायंकाळी पाचच्या सुमारास संबंधित महिलेचा पती घरी आल्यावर ही घटना त्यांना कळाली, त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. (Nanded crime news)

माहिती समजताच कुंटुर पोलिसांचे एक पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. महिलेच्या डोक्यात खलबत्याने ठेचून अतिशय क्रूरपणे खून करण्यात आल्याचे समोर आले. श्रीनिवास वटपलवाड मानसिक रोगी आहे. या घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बरबडा गावावर शोककळा पसरली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल बहात्तरे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news