जालना: एसटीची चाके थांबली; अंबड आगाराचे लाखोंचे नुकसान | पुढारी

जालना: एसटीची चाके थांबली; अंबड आगाराचे लाखोंचे नुकसान

अंबड, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणा-या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीमार केला. त्यानंतर ठिकठिकाणी एसटी बसची जाळपोळ आणि तोडफोड सुरू झाली. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील एसटीची वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.

अंबड आगाराच्या 63 बसेस दररोज 274 फे-या करून 20 हजार 950 किमी अंतराचा प्रवास करतात. यातून 11 लाख 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, दोन दिवसांपासून एसटीची चाक थांबल्याने अंबड आगाराचे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलनादरम्यान फोडलेल्या दोन बसेसचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर अंबड डेपो अंतर्गत वाहतूक करणाऱ्या तब्बल 16 बसेस व कर्नाटक सरकारची एक बस जाळल्याने 4 कोटी 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. एसटीची जाळपोळ करुन तोडफोड करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एसटीची चाके थांबल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास होऊ लागला आहे. एसटी सेवा सुरू करण्याची प्रवाशांतून मागणी होत आहे.

हेही वाचा 

Back to top button