पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे मराठा आंदोलकांशी चर्चा केली. तर दुसरीकडे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नव्हता, त्यामुळे बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.२) दिली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलनस्थळाला पवारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. (Sharad Pawar)
पवार म्हणाले की, मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. शब्द न पाळल्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आले. एकीकडे चर्चा केली, तर दुसरीकडे लाठीचार्ज केला. आंदोलकांना पागविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक आणण्यात आली होती. अंतरवाली सराटी गावात घडलेले घटना दुर्दैवी आहे, असे पवार म्हणाले. (Sharad Pawar)
यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे ज्या पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यांना निलंबित करण्यात यावे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी उदयनराजे यांनी यावेळी केली. त्याचबरोबर इतर समाजाला न्याय दिला जातो. मग मराठा समाजाला न्याय का दिला जात नाही, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा