हिंगोली-जुगार अड्ड्यावर छापा, ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

हिंगोली-जुगार अड्ड्यावर छापा, ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली- पुढारी वृत्तसेवा – औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे जोडपिंपरी येथे जुगार खेळत असल्याच्या गुप्त माहितीवरून औंढा नागनाथ पोलीस पथकाने कारवाई केली. मौजे जवळ पिंपरी येथे दिनांक 30- 8- 2023 रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास औंढा पोलीस स्टेशनच्या पथकाने कार्यवाही केली.

मौजे जोडपिंपरी येथे पाण्याच्या टाकीच्या जवळ सार्वजनिक रोडवर लिंबाच्या झाडाखाली गोल रिंगण करून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळला जात होता. पोलीस जमादार संदीप टाक यांनी आरोपी मुरलीधर गंगाराम पवार, सुभाष रंगा पवार, रोहिदास सखाराम आडे ५०० सर्व राहणार जोड पिंपरी तालुका औंढा यांना रंगेहात पकडले. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आणून गुन्हा नोंद केला आणि त्यांच्याजवळून मोबाईलसह एकूण 35 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Back to top button