हिंगोली: १० हजारांची लाच घेताना पं. स.तील अधिकारी जाळ्यात

File Photo
File Photo
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या हमी योजना कार्यालयातील पालक तांत्रिक अधिकारी जे. एम. पठाण यांना १० हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.३०) सायंकाळी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या चौथ्या हप्त्याचा कुशल निधी देण्यासाठी ही रक्कम त्याने मागितली होती.

शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे बांधकाम केले होते. या विहिरीचा कुशल कामाचा चौथा हप्ता देण्यासाठी पालक तांत्रिक अधिकारी जे. एम. पठाण याने दोन शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदर रक्कम आज देण्याचे ठरले होते.त्यानंतर तक्रारदाराने यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यावरून उपाधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक प्रफुल अंकुशकर, विनायक जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनूस, विजय शुक्ला जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, तान्हाजी मुंडे, गजानन पवार, गोविंद शिंदे, राजाराम फुफाटे, शिवाजी वाघ, शेख अकबर यांच्या पथकाने सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती परिसरात सापळा रचला होता.
यावेळी तक्रारदाराकडून १० हजारांची लाच घेताना पठाण याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news