हिंगोली : नात्‍यातील विधवा महिलेवर अत्‍याचार; तरूणावर गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : नात्‍यातील विधवा महिलेवर अत्‍याचार; तरूणावर गुन्हा दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये पेन्शनपुरा भागात तरुणाने नात्यातीलच एका विधवा महिलेसोबत प्रेम संबंध निर्माण करून लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्या तरुणावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात (गुरुवार) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

शहरातील पेन्शनपुरा भागात एक महिला तिच्या मुलासह राहते. तीन वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्या नात्यातीलच तरुणाने महिलेसोबत प्रेम संबंध निर्माण केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास विशाल महिलेच्या घरी आला. यावेळी महिलेने लग्नाबाबत विचारणा केली. मात्र त्याने उत्तर देण्याचे टाळले. त्यानंतर त्याने महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. या प्रकारानंतर महिलेने गुरुवारी रात्री थेट हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तरूणा विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, उपनिरीक्षक आगलावे, जमादार संजय मार्के, धनंजय क्षीरसागर, संभाजी लकूळे यांच्या पथकाने आरोपी विशाल यास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button