

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिर परिसरातून घनसावंगी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गेवराईच्या युवकावर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.२३) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील कोल्हा परिसरात असलेल्या यशवाडी मारूती मंदिरात बरेच भाविक दर्शनासाठी येत असतात. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील हातडी येथील सुनीता काळे व माणिक काळे आपल्या भावाच्या मुलीला घेऊन दर्शनासाठी शनिवारी (दि. १९) मंदिरात आले होते.
मारुती मंदिरात त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर सुनिता काळे व त्यांचे पती माणिक काळे त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीला थांबण्यास सांगून सामान आणण्यासाठी गेले. यावेळी अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून बीड जिल्ह्यातील बागेवाडी येथील गंगा रामदास भोसले याने अल्पवयीन मुलीस पळवुन नेले.
संगीता माणिक काळे यांच्या फिर्यादीवरून गंगा रामदास भोसले याच्यावर मानवत पोलिसात ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास मानवत पोलीस उपनिरीक्षक जंत्रे हे करीत आहेत.
हेही वाचा;