बीड : तलाठी परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन; परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी | पुढारी

बीड : तलाठी परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन; परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी

बीड : पुढारी वृत्‍तसेवा बीडमध्ये तलाठी परीक्षा देण्यासाठी आलेल्‍या परीक्षार्थींवर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. याचे कारण परीक्षेचा सर्व्हर डाऊन झाला आहे. यामुळे तलाठी परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळी नऊ वाजता पेपर सुरू होणार होता. त्यापूर्वी सात वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाणार होते. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी खोळंबले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यातून आलेले आहेत. पहाटे चार वाजल्यापासून हे विद्यार्थी ठाण मांडून आहेत. मात्र दहा वाजेपर्यंत देखील त्यांना आत सोडण्यात आलेले नव्हते. मात्र नंतर विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. महाराष्‍ट्रातील अनेक परीक्षा केंद्रांवर हा प्रकार दिसून आला. मात्र यामुळे परीक्षेसाठी आलेल्‍या विद्यार्थ्यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले. एकंदरीत तलाठी परीक्षेत सर्व्हर डाऊन असल्याने हा गोंधळ पाहायला मिळाला.

हेही वाचा : 

Back to top button