बीड : ७ कोटी खर्च करुनही वीस खेडी योजना धूळखात | पुढारी

बीड : ७ कोटी खर्च करुनही वीस खेडी योजना धूळखात

अंबाजोगाई, पुढारी वृत्तेसवा : दुष्काळी काळामध्ये अंबाजोगाई-परळी तालुक्यातील शंभर गावांना पाणी पुरवठा करणार्‍या पुस वीस खेडी योजना  सध्या विजे अभावी धुळखात पडली आहे. योजनेला खुप दिवस झाल्यामुळे शासनाने 7 कोटी रूपये खर्च करून ही योजना पुनरूज्जीवीत केली. ७ कोटी रूपये सध्या पाण्यात गेल्याचे सुत्र निर्माण झाले आहे. लोक प्रतिनिधी व प्रशासक या योजनेकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यात दुषित पाणी पिण्याची वेळी आली आहे.
मागील चार ते पाच वर्षापूर्वी तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात पुस वीस खेडी योजनेने परळी-अंबाजोगाई तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. दुष्काळी परिस्थितीवर मात केली. या नंतरही योजना  मोडकळीस आल्यामुळे तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे योजनेचे पुनरुज्जीवीत करण्यासाठी शासनाकडून सात कोटी रूपयांचा निधी मंजुर करून दिला. या निधीतून अंबलवाडी उपसा केंद्रातील मोटारीचे संच  तर पुस जलशुद्धीकरण केंद्रातील मोटारी व शुद्धीकरण केंद्रात अद्यावत मशनरी बसवून ही योजना पुन्हा नव्या जोमाने चालेल अशी आशा होती.
परंतु, या योजनेवर पुस व अंबलवाडी या दोन्ही पाणी पुरवठा ग्राहकांकडे  ५ लाख ३८ हजार रूपयांचे विज बिल थकल्यामुळे महाविरण कंपनीने १ ऑगस्ट रोजी विज पुरवठा खंडीत केला आहे. अंबलवाडी साठवण तलावात मुबलक पाणी साठा असताना ही ही योजना विजे अभावी धुळखात पडली आहे. ७ कोटी रूपये खुर्चुन देखील ही योजना कायम चालली नाही. कधी बंद तर कधी चालू असाच कार्यकाळ राहिला आहे. त्यामुळे योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला. तर आता पावसाळ्यात दुषित पाणी पिण्याची वेळ आली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नाही
पुस वीस खेडी योजनेचा विज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी बीडच्या जिल्हा परिषदेकडे सध्या निधी उपलब्ध  नसल्यामुळे विज बील भरणा करण्यात आलेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अंबाजोगाई व परळीच्या गटविकास अधिकार्‍यांना पत्र काढले असून सदरील विज बिलापोटी ग्रामपंचायतकडून पाणी पट्टी वसुल करावी असे आदेश.
-अजिंक्य देशमाने, अभियंता जि.प.पाणी पुरवठा बीड.
पेरणी झाल्यामुळे नागरिकांकडून वसुली होत नाही
सध्या शेतकर्‍यांच्या शेतामध्ये खरीपाची पेरणी झाल्यामुळे त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नाही त्यामुळे पाणी पट्टी वसुल करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे विज बील भरण्यासाठी ग्रामपंचायतकडे देखील निधीची तरतुद नाही.
ज्ञानेश्‍वर पवार, सरपंच ग्रा.पं.पुस

हेही वाचलंत का?

Back to top button