

अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी-सुनेगाव येथे आज (दि. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या बस- ट्रक अपघातात २९ जण जखमी झाले. यापैकी १२ जण गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथे त्यांना हलविण्यात आले आहे.
लातूरहून नांदेडकडे बस (एमए २४ एयू.८१६०) जात होती. तर नांदेडहून लातूरकडे ट्रक (एमएच.२६ बीई-४५७६) जात होता. यावेळी अहमदपूर तालुक्यातील सांगवी-सुनेगाव येथे मेनवल पुलाजवळ बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसमधील २९ प्रवाशी जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून प्रवाशांना ग्रामीण रूग्णालय अहमदपूर येथे दाखल केले. त्यानंतर काही गंभीर जखमींना जिल्हा रूग्णालय लातूर येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचा