

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण आटोपल्यानंतर पाहुण्यांचे अभिवादन करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना पाहताच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. हा प्रकार दुसऱ्यांदा घडल्यामुळे पत्रकारांनी खैरे यांना विचारले असता त्यांनी आमचं सरकार येईपर्यंत घटनाबाह्य पालकमंत्र्यांचे अभिवादन स्वीकारणार नसल्याचे सांगत ते निघून गेले. यावरून मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात कलगीतुरा रंगला.
प्रजासत्ताक दिन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अथवा स्वातंत्र्य दिन असो पालकमंत्री संदीपान भुमरे हे अभिवादन करण्यासाठी येताच. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अभिवादन न स्वीकारताच निघून जातात. मंगळवारी देखील विभागीय आयुक्त कार्यालयात असाच प्रकार घडला. त्यामुळे पत्रकारांनी खैरे यांना याबाबत विचारले यावा ते म्हणाले, आपण घटनाबाह्य पालकमंत्र्यांचे आभिवादन स्वीकारत नाही.
शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट म्हणाले की, हा राजकीय कार्यक्रम नव्हता. देशासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण जमलो आहोत. तेव्हा राजकारण बाजूला ठेवायला हवे. ही खैरेंची नेहमीच सवय असल्याची टीकाही शिरसाट यांनी केली.
पालकमंत्री भुमरे म्हणाले की, खैरेंनी सरकार येण्याचे स्वप्न पाहू नये, त्यांच सरकार कधीच येणार नाही असे उत्तर दिले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी खैरेंना काम असेल म्हणून गेले असतील ही राजकारण करण्याची वेळ नाही अशी प्रतिक्रिया दिली.
-हेही वाचा