जालना : वाळू माफियांकडून दोन हायवाजप्त, साडेपाच लाखांचा ठोठावला दंड | पुढारी

जालना : वाळू माफियांकडून दोन हायवाजप्त, साडेपाच लाखांचा ठोठावला दंड

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदनचे तहसीलदार संतोष बनकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाळू माफियांवरील कारवायांना वेग आला आहे. मागील दोन दिवसात दोन हायवासह मुद्देमाल जप्त करुन दोन्ही वाहनास ५ लाख ४४ हजार ३३० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.  तसेच दररोज गिरजा-पुर्णा नदीपात्रातून वाळू जात असल्याने वाळूमाफियांमध्ये कारवाई पासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत.

याबाबत अधिकची माहिती अशी की, तहसीलदार संतोष बनकर यांनी बुधवारी (दि.०८) रोजी बरंजळा साबळे येथे अवैध रित्या वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडून कारवाईचा बडगा उगारला आहे. दुसऱ्या दिवशीही गुरुवारी (दि.०९) मध्यरात्री ११ वाजता जालना-भोकरदन मुख्य रस्त्यावरील बरंजळा फाट्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला आहे. या दोन्ही कारवाईत दोन हायवासह मुद्देमाल जप्त करुन वाहनास ५ लाख ४४ हजार ३३० रुपये  दंड करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button