Adhir Ranjan Chowdhury : पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित | पुढारी

Adhir Ranjan Chowdhury : पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना आज (दि.१०) लोकसभेत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन होण्यापूर्वी चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले होते.  लोकसभेत काँग्रेस नेत्याचे निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधीर रंजन चौधरी यांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. (Adhir Ranjan Chowdhury)

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेत निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधीर रंजन चौधरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “गेल्या तीन दिवसांपासून सभागृहात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होती. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आज (दि.१०) सभागृहात येऊन प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमचे जे प्रमुख मद्दे उपस्थि केले होते, त्यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. (Adhir Ranjan Chowdhury)

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत एक प्रस्ताव मांडला की, “अधीर रंजन चौधरी सभागृहाच्या आणि सभापतींच्या अधिकारांची अवहेलना केली आहे. सभागृहाने त्यांनी जाणूनबुजून आणि वारंवार केलेल्या गैरवर्तनाची दखल घेतली आहे. त्यांच्या गैरवर्तवणुकीचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात येईल. समिती चौकशी करुन अहवाल देईपर्यंत अधीर रंजन चौधरी सभागृहातून निलंबित राहतील. (Adhir Ranjan Chowdhury)

हेही वाचंलत का?

Back to top button