जालना : शाळेतून घरी जाणाऱ्या मुलाचा अपहरणाचा प्रयन्त | पुढारी

जालना : शाळेतून घरी जाणाऱ्या मुलाचा अपहरणाचा प्रयन्त

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे जिल्हा परिषद शाळेतून घरी परत जाणाऱ्या विद्यार्थ्यांला पकडून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना साडेपाचच्या सुमारास पळसखेडा पिंपळे शिवारात घडली. चेतन पिंपळे असे अपहरणाचा प्रयत्न झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता दुसरीत शिकतो.

याबाबतची माहिती अशी की, चेतन हा शाळा सुटल्यानंतर पाचच्या सुमारास आपल्या घरी जाण्याअगोदर शाळेच्या आवारात खेळत होता. दरम्यान, कार मधून आलेल्या चार जणांनी चेतनला पकडून त्याचे हात पाय बांधले. शिवाय, त्याला पोत्यात कोंबण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी आरडा ओरड केल्याने कारमधून आलेल्या लोकांनी चेतनला त्याच ठिकाणी सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळतात गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन या विद्यार्थ्याला त्याचा पालकाच्या स्वाधीन केले असून या परिसरात या कारचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button