जेष्ठ कवी पदमश्री ना.धों महानोर यांच्यावर मुळगावी पळसखेड्यात होणार अंत्यविधी | पुढारी

जेष्ठ कवी पदमश्री ना.धों महानोर यांच्यावर मुळगावी पळसखेड्यात होणार अंत्यविधी

सागर भुजबळ

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : जेष्ठ कवी पदमश्री ना.धों महानोर यांचे गुरुवारी (दि.3) सकाळी 8 वाजता वैद्यकीय उपचारा दरम्यान पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच पळसखेडा गावा सह संपूर्ण सोयगाव तालुक्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

पंधरा दिवसापूर्वी किडनीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव पुण्याहून त्यांच्या मुळगावी पळसखेडा येथील त्यांच्या पाणकळा या निवास्थानी आणण्यात येणार असून शुक्रवारी दुपारी चार वाजता त्यांच्या पळसखेडा या मुळ गावी शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे धाकटे बंधू पुंडलिक महानोर यांनी दिली आहे.

16 सप्टेंबर 1942 मध्ये ज्येष्ठ कवी पद्मश्री ना.धों महानोर यांचा सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या खेडे गावात जन्म झाला. पुढे साहित्य व कला क्षेत्रात त्यांनी मोठे नाव लौकिक मिळविले. त्यांच्या रानातल्या कविता, वही, पावसाळी कविता, अजिंठा, पानझड, प्रार्थना दयाघना या काव्यसंग्रहांना तर गांधारी या कादंबरीला महाराष्ट्र शासना सह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी जैतरे जैत, सर्जा, या चित्रपटांसह अनेक मराठी चित्रपटांसाठी गीत लेखन ही केले दरम्यान साहित्य व कला क्षेत्रासह कृषी, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.

सन 1978 ते 84 सन 1990 ते 95 या काळात त्यांची दोनवेळा विधानपरिषदेवर निवड करण्यात आली होती.सन 1991 मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आले.10 सप्टेंबर 2021 मध्ये त्यांच्या पत्नी सुलोचना महानोर यांचे निधन झाले.त्यानंतर त्यांनी पत्नीसाठी निरोप ही शेवटची काव्य रचना केली.

दरम्यान पंधरा दिवसापूर्वी त्यांना किडनी चा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत होते.उपचारा दरम्यान गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव शरीर त्यांच्या पळसखेडा येथील निवास्थानी आणण्यात येणार असून शुक्रवारी दुपारी चार वाजता शासकीय इतमामात पळसखेडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे धाकटे बंधू पुंडलिक महानोर यांनी दिली आहे. शासनाच्या वतीने तहसीलदार विठ्ठल हरणे सापोनि भरत मोरे यांचे पथक पळसखेड्यात तळ ठोकून आहे.

.हेही वाचा 

Namdeo Dhondo Mahanor : ‘मराठी मातीतला ‘रानकवी’ हरपला’; मुख्यमंत्र्यांची ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

N D Mahanor | लेखक, कवी, शेतकरी ते आमदार…! असा होता ना. धों. महानोर यांचा जीवनप्रवास

N D Mahanor Death | ना. धों. यांचे निधन पावसाळ्यात व्हावं हा योग मनाला चटका लावणारा : शरद पवार

 

 

Back to top button