सौंदर्य पाहून प्रियंका चतुर्वेदींना शिवसेनेने दिली राज्यसभेची उमेदवारी : संजय शिरसाट | पुढारी

सौंदर्य पाहून प्रियंका चतुर्वेदींना शिवसेनेने दिली राज्यसभेची उमेदवारी : संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा : या कोण प्रियंका चुतर्वेदी, असा सवाल करत चतुर्वेदींचे सौंदर्य पाहून शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी त्यांना दिली होती, असे विधान माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकदा भाषणात केले होते, असे सांगत तीच का ही महिला, अशी टीका शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी (दि. ३०) माध्यमाशी बोलताना केली.

ठाणे येथील सभेत ठाकरे गटाच्या खा. प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटांच्या आमदारांना गद्दार असे संबोधून सडकून टीका केली. यावर उत्तर देताना आ. शिरसाट यांनी चतुर्वेदी यांचा एकेरी उल्लेख केला.तसेच त्यांना आम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.

उत्तर भारतीयांना उठसूट शिव्या घालणारे व त्यांना मुंबईबाहेर हाकलून देण्याबाबत नेहमीच बोलणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे येथे उत्तर भारतीयांची सभा घेतली. ही सभा म्हणजे मताचे राजकारण आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी उत्तर भारतीय त्यांना भीक घालणार नाहीत. त्यांचा हा एक केविलवाणा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. खरा शिवसैनिक दूर जात असल्याने ते आता उत्तर भारतीयांना गळ घालत असल्याचाही आरोप यावेळी आ. शिरसाट यांनी केला.

हेही वाचा : 

Back to top button