परभणी: तांदूळवाडी येथील जवानाचा राजस्थान येथे अपघाती मृत्यू | पुढारी

परभणी: तांदूळवाडी येथील जवानाचा राजस्थान येथे अपघाती मृत्यू

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : लष्करात तांत्रिक विभागात सेवेत असलेले जवान लक्ष्मण रामराव तांदळे (वय ३४) यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे गंगाखेड तालुक्यासह तांदूळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. लक्ष्मण तांदळे यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.२६) तांदुळवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप शेलार यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तांदुळवाडी येथील लक्ष्मण रामराव तांदळे अलोर (राजस्थान) येथे तांत्रिक विभागात कर्तव्यावर होते. सोमवारी (दि.२३) रात्री उशिरा ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा अपघात झाल्याचे लष्करी कार्यालयास कळाले.

त्यानंतर लष्करातील अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने जयपूर येथील सैनिक इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, मंगळवारी (दि.२४) दुपारी २ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबतची अधिकृत माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी लक्ष्मण तांदळे यांच्या कुटुंबीयाना कळवली. लष्कराचे पथक त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी तांदुळवाडी येथे घेऊन पोहोचणार आहेत. बुधवारी (दि.२६) दुपारी १२ च्या सुमारास  पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा;

Back to top button