

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घणसांवगी तालुक्यातील तळेगाव येथे तलावात बुडून दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तळेगाव येथील भारत येडे (१७), अर्चना संजय भालेराव (१५ दोघे रा. तळेगाव)हे शेळ्या चारण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. अभिजीत येडे आणि अर्चना भालेराव हे दोघे गुरूवारी सकाळी शेळ्या चारण्यासाठी गेले होते. परंतु, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेळ्या घरी आल्या मात्र दोघे घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला.त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारपूस केली.
रात्री आठ वाजेच्या सुमारास तळेगाव येथील तलावात अभिजीत येडे याच्या चपला पाण्यावर तरंगतांना दिसल्या. त्याच ठिकाणी पाणी पिण्याची बोटलही दिसून आली. याची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली. सकाळी नातेवाईकांनी गळ टाकून पाहिला असता, अभिजीत येडे याचा मृतदेह बाहेर आला. नंतर काहीवेळाने अर्चना भालेराव हिचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राणी उंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती बीट जमादार एम. बी. स्कॉट यांनी दिली.