हिंगोली: शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सेनगाव पं.स.मध्ये भरवली शाळा | पुढारी

हिंगोली: शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सेनगाव पं.स.मध्ये भरवली शाळा

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षकांच्या जागा त्वरित भरण्यासाठी ठाकरे गटाच्या युवासेनेने आज (दि.१८) सकाळी ११ वाजता सेनगाव पंचायत समितीमध्ये शाळा भरवून आंदोलन केले. शिक्षकांची भरती नाही केली, तर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षक द्या, शिक्षक द्या, अशा घोषणा केल्या.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण अधिकारी सोनटक्के यांना निवेदन देण्यात आले. पंधरा दिवसांत जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांच्या जागेवर शिक्षक देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी सांगितले की, येत्या पंधरा दिवसांत जर शिक्षकांची नियुक्ती केली नाही तर शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येईल. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर, शिवसेना शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख, युवा सेना प्रवीण महाजन, नगरसेवक वैभव देशमुख, स्वप्निल देशमुख, संतोष गाढवे, सर्कल प्रमुख, संजय चिलगर, संतोष कापसे, हेमंत संगई, गणेश रंजवे, सुनील शिंदे, करण देशमुख, बी. आर. नायक, विनायकराव हराळ, देविदास पाटील कुंदर्गे, बद्री पाटील कोटकर आदी पदाधिकारी व तालुक्यातील विद्यार्थी पालक वर्ग शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button