परभणी : मानवतला अवैध सावकाराच्या घरी धाड; सहकार विभागाच्या कारवाईने खळबळ | पुढारी

परभणी : मानवतला अवैध सावकाराच्या घरी धाड; सहकार विभागाच्या कारवाईने खळबळ

मानवत, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाळोदी रोडवर असलेल्या एका घरात अवैध सावकारी प्रकरणी आलेल्या तक्रारीवरून सहकार विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१४) धाड टाकून अनेक संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेऊन परभणी कार्यालयात पाठविण्यात आली आहेत. अवैध सावकारी सिद्ध झाल्यास महाराष्ट्र सावकार अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे.

सावकारांचे सहाय्यक निबंधक यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ अधिकारांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख एम. बी. धुमाळ सहकार अधिकारी व प्रभारी सहायक निबंधक सहकारी संस्था मानवत यांनी सदस्यांसह शहरातील पाळोदी रोड वरील बाबासाहेब नामदेव साबळे यांचे राहते घरी धाड टाकली. या धाडीत अनेक कागदपत्रे जप्त करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

या पथकात शेख उस्मान, अलका जवळेकर, एन. एन. पुंजारे, पी युवारे, पोलीस कर्मचारी सुभाष नाईक, एस. सी. सोळंके, एस टी शेख, एस बी शेख यांचा समावेश होता. तालुक्यात अशाप्रकारे अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीसोबत नागरिकांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण व्यवहार करू नये. तसे आढळून आल्यास पुराव्यासह सहाय्यक निबंधक कार्यालयात माहिती द्यावी असे आवाहन सावकारांचे निबंधक एम बी धुमाळ यांनी केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button