उस्मानाबाद : दिवाळीच्या सुट्टीमध्ये बदल, विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम | पुढारी

उस्मानाबाद : दिवाळीच्या सुट्टीमध्ये बदल, विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम

कळंब (उस्मानाबाद ); पुढारी वृत्तसेवा : शिक्षण संचालक पुणे यांनी २० एप्रिल २०२१ रोजी काढलेल्या पत्रानुसार राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत जाहीर केल्या होत्या. परंतु आज (दि. २७) या सुट्ट्यांमध्ये बदल करून दि. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंतच्या सुट्टीचे अचानक आदेश काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला असल्याची चर्चा आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील आठवी ते दहावी पर्यंतच्या शाळेत उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून सध्या प्रथम सत्र परीक्षा सुरू आहे. या परीक्षा ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू रहाणार आहेत. आता या परीक्षा पूर्ण घ्यायच्या की सुट्टी द्यायची यामुळे शाळा प्रशासन गोंधळात पडले आहे.

याबाबत उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उस्मानाबाद येथे शिक्षणाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असून परीक्षेबाबतचा निर्णय कळवू असे सांगितले.

आज (दि. २७) हा आदेश आल्यावर मला अनेक फोन येत आहेत. या बाबत मी ज्यांनी आदेश काढला त्यांच्या संपर्कात असून मी याबाबत स्पष्टीकरण देईल असे सांगितले.

-आ. काळे

 

असा अचानक सुट्याचा आदेश आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी प्रथम सत्रांचे मुलयांकन सुरू आहे. अशा परिस्थितीत अचानक शासनाने अधिकारयांचे ऐकून आदेश काढून गोंधळ निर्माण केला आहे. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी हा आदेश मागे घेऊन पुर्वीचाच निर्णय कायम ठेवावा.

-के. पी.पाटील, (अध्यक्ष : स्वाभिमानी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य)

 

Back to top button