बीड : धायगुडा पिंपळा शिवारात आयशर टँम्पो चालकास लुटले; चालकावर केले तलवारीने वार

बीड : धायगुडा पिंपळा शिवारात आयशर टँम्पो चालकास लुटले; चालकावर केले  तलवारीने वार
Published on
Updated on

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : अहमदपुरकडून येणार्‍या आयशर टॅम्पो चालक धायगुडा पिंपळा ते परळी रोडवरील दुरदर्शन केंद्राजवळ टेम्पो थांबवून लघुशंकेसाठी थांबले. दरम्यान, शाईन गाडीवर आलेल्या तिघांनी या चालकास तलवारीने वार करून जवळील एक हजार रुपये घेवून पोबारा केला. जखमी चालकाने धायगुडा पिंपळा येथील सय्यद आफरोज याला माहिती दिल्यानंतर त्याने मित्रासमावेत त्या तीन चोरट्याची दुचाकी अडवली. परंतु या तील दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही घटना शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी ७.३० वाजता घडली. एक जणाला ग्रामीण पोलिसाच्या हवाली केले असून या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदपुरकडून आयशर टेम्पोवर चालक म्हणून वरवटी येथील जनार्धन उत्तम उघडे हे चालक होते. टेम्पोमध्ये लिक्वीड भरल्यामुळे गावी जात होते. पिंपळा धायगुडा येथून परळीकडे जाणार्‍या रस्त्यावरील दुरदर्शन केंद्रा नजीक उघडे हे टेम्पो रोडलगत उभे करून लघुशंकेसाठी खाली उतरले. त्यानंतर शाईन दुचाकी गाडीवर आलेल्या तिघाजणांनी चाकु व तलवारीने वार करण्यास सुरुवात केली. संबंधीत चालकाने मारहाण करु नका विनवणी केली. तरी त्यातील एक जणाने खिशातील एक हजार रूपये व मोबाईल हिसकावून घेत चाकूने पायावर वार केले. आणि तिघेजण विनानंबरच्या शाईन गाडीवर धायगुडा पिपंळा दिशेने निघून केले. चालक उघडेच्या मित्रामुळे यातील एक जण सापडला असला तरी अन्य दोघे जण पळून गेले आहेत. ग्रामिण पोलिसांनी या आरोपीसह त्याच्याकडील दुचाकी एक चाकु मोबाईल व एक हजार रूपये जप्त केले आहेत. त्याच्या विरोधात ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील सहायक पोलिस निरिक्षक राजेंद्र घुगे हे करीत आहेत.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news