नांदेड: महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने चिरडले

नांदेड: महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने चिरडले
Published on
Updated on

हिमायतनगर; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थिनीला महामार्ग ओलांडताना भरधाव ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २७) सकाळी ९ च्या सुमारास भोकर- हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील मोरगाव पाटीजवळ घडली. पूजा देवजी चिटकुरलेवाड (वय १७, रा. मोरगाव, ता. हिमायतनगर) असे अपघातातील मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. महाविद्यालयाचा तिचा आज पहिलाच दिवस होता. त्याचदिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पूजा भोकर येथील घिसेवाड महाविद्यालयात ११ वीचे शिक्षण घेत होती. आज पहिल्याच दिवशी कॉलेजला जाण्यासाठी मोरगाव पाटीवर ती पोहोचली. यावेळी भोकरहून हिमायतनगरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने (एमएच ३८ डी. ०२८४) पूजाला जोराची धडक दिली. यात पूजाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रक चालक स्वराज गफार खान घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान, पोटा बु. येथील पोलीस पाटील अराध्य यांच्यासह सुदर्शन माने, साईनाथ वालेगावकर, दत्ता जाधव, पपु कोटुळे, दत्ता सोळंके यांनी ट्रकचा पाठलाग केला. आणि ट्रक हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर, पो. का. नंदलाल चौधरी यांच्या ताब्यात दिला.
तामसा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दळवी, बिट जमादार जोगदंड, सुर्यवंशी यांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह भेकर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. अधिक तपास तामसा पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news