नांदेड: सिताखांडी घाटात भीषण अपघातात ४ जण ठार; ४ जण गंभीर जखमी

नांदेड: सिताखांडी घाटात भीषण अपघातात ४ जण ठार; ४ जण गंभीर जखमी
Published on
Updated on

भोकर; पुढारी वृत्तसेवा:  नांदेडहून भोकरकडे येणाऱ्या चारचाकी गाडीची आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात ४ जण जागीच  ठार झाले. तर चौघे जण गंभीर जखमी झाले. ही  घटना आज (दि. १९)  दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भोकर नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात झाली.

नांदेडहून प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी गाडी (एमएच २६ बीएक्स ३८१५) सिताखांडी घाटात आली. यावेळी समोरून आलेल्या  टेम्पोची  (एमएच १९ एस ४९९३) समोरासमोर धडक झाली. यात भुलाबाई गणेश जाधव (वय ४५, रा. पोटा तांडा), संदीप किशनराव किशवे (वय २६, रा. हाळदा), संजय इरबा कदम (वय ४८, रा. हिमायतनगर), बापूराव रामसिंग राठोड (वय ५७, रा. पाकीतांडा) यांचा मृत्यू झाला. तर  देवीदास गणेश जाधव (रा पाकीतांडा), परमेश्वर केशव महाजन (रा. इरसनी), कैलास गणपत गडमवाड (रा. सिरंजनी), मंगेश गोविंद डुकरे (वय २२, रा. लहान) हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही गाड्याचा चुराडा झाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news