बीड : अवघी दुमदुमली राक्षसभुवन नगरी; शनी अमावस्या निमित्त भाविकांची मांदियाळी | पुढारी

बीड : अवघी दुमदुमली राक्षसभुवन नगरी; शनी अमावस्या निमित्त भाविकांची मांदियाळी

बीड : पुढारी वृत्‍तसेवा भारतात शनीची साडेतीन शक्तीपीठे असुन, उजैन, नाशिक जिल्ह्यातील नस्तनपूर, राक्षसभुवन आणि बीड येथील अर्धे अशी एकुन साडेतीन पीठे आहेत. शनिवारी शनी अमावस्येचा योग आल्याने पहाटे पासुनच राक्षसभुवन येथील शनी मंदिरात शनी भक्तानी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनी महाराज की जय च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमुन गेला होता. परिसरात पानफुल, नारळ, तेल, पेढे, रेवडीची दुकाने थाटली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी येथील संस्थानने दर्शनबारी साठी बॅरीगेट उभा केले होते.

अनेक भक्तांच्या वतीने मोफत फराळचे वाटप करण्यात आले होते. ट्रस्टच्या वतीने शनिवारी महाआरती करण्यात आली. भविकांची गैरसोय होऊनाही म्‍हणुन गेवराई आगारासह बीड, माजलगाव येथुन मोठ्या प्रमाणात बसेस सोडण्यात आल्या होत्या. चकलांबा, गेवराई, तलवाडा शहर वाहतूक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

राक्षसभुवन संस्थानच्या वतीने. शनी महाराज यांच्या मुर्तीला फुलांच्या माळांची सुंदर सजावट करण्यात आली होती. गोदावरीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर ऐतिहासिक असून, साडेतीन पिठांपैकी एक आहे. यामुळे दुर दुर वरून भक्‍तगण या ठिकाणी येत असतात.

हेही वाचा : 

Back to top button