बीड : बोरगाव (बु.), आथर्डी शिवारात बिबट्याचा वावर; शेतकर्यात घबराट

बीड : पुढारी वृत्तसेवा केज तालुक्यातील बोरगाव (बु.) हे बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेले गाव आहे. या गावातून मांजरा नदी वाहते. नदी ओलांडताच आथर्डी या धाराशीव जिल्ह्यातील गावाचा शिवार सुरू होतो. नदीच्या अलीकडे बोरगाव शिवाराला गाडेमोडी हे नाव आहे. गाडेमोडी शिवारात त्र्यबंक हरीदास लांडगे यांची आंबराई आहे. आज (शुक्रवार) सकाळी ८:०० वाजता आंबे उतरण्यासाठी लांडगे आंबेराईत गेले होते. त्यांना नदीतून बिबट्या आल्याचे दिसले. तेव्हा ते तात्काळ आंब्याच्या झाडावर चढले. बिबट्या जवळील शेतातील ऊसात गेल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला.
त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती बोरगाव, आथर्डीच्या शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे बोरगाव, आथर्डी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा :