"राज्यात औरंगजेबाच्याच नव्हे, गोडसेच्या औलादीही वाढल्या" | पुढारी

"राज्यात औरंगजेबाच्याच नव्हे, गोडसेच्या औलादीही वाढल्या"

छत्रपती संभाजीनगर : राज्यात केवळ औरंगजेबाच्याच नव्हे, तर नथुराम गोडसेच्यादेखील औलादी वाढल्या आहेत, असे म्हणत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. हे सर्व काही मतांच्या ध्रुवीकरणासाठी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोल्हापूरच्या दंगलीनंतर औरंगजेबचे स्टेटस ठेवणार्‍यांना व पोस्टर झळकावणार्‍यांना फडणवीस यांनी औरंगजेबच्या औलादी असल्याचे म्हटले होते. औरंगजेबाच्या एवढ्या औलादी बाहेर आल्या कुठून, असा सवालही त्यांनी केला होता. त्याला जलील यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. ते म्हणाले की, कोल्हापूरमध्ये एकाने सोशल मीडियाच्या अकाऊंटवर औरंगजेबचे स्टेटस ठेवले होते. त्यावरून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात तो फोटो औरंगजेबचा नव्हताच. तो टिपू सुलतानचा फोटो होता.

फडणवीस यांच्या वक्तव्यावर इम्तियाज जलील म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे राज्याचे मोठे पद आहे. या पदावर विराजमान असलेल्यांनी जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे.

Back to top button