हिंगोली : गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी हिंगोलीत होणार आगमन | पुढारी

हिंगोली : गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी हिंगोलीत होणार आगमन

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी हिंगोलीत होणार आगमनदरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त श्री संत गजानन महाराज शेगाव यांची पालखीचे २६ मे रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. सोमवारी पालखीचे हिंगोलीत आगमन होणार आहे. २७ जून रोजी पंढरपूर येथे ही पालखी पोहचणार आहे. २७ जून ते २  जुलै पर्यंत पालखीचा पंढरपूर येथे मुक्काम राहणार असून ३ जुलै रोजी पालखीच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

श्री संत गजानन महाराज पालखीचे पारस, भौरप, अकोला, वाडेगाव, पातुर, श्री क्षेत्र डवहा, शिरपूर, महसलापेन, रिसोड मार्गे ५ जून रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव मुक्कामास आगमन होणार आहे. ६ जून रोजी डिग्रस मुक्काम तर ७ जूनला जवळा बाजार मुक्काम होणार आहे. त्यानंतर परभणी मार्ग दैठना, गंगाखेड, परळी वैजनाथ, आंबेजोगाई, कळंब, तेरणा सहकारी साखर कारखाना, धाराशिव, श्री क्षेत्र तुळजापूर, सोलापूर, मंगळवेढा मार्गे २७ जून रोजी पंढरपूर येथे पालखीचे आगमन होणार आहे. तर २७ जुन ते दिनांक २ जुलै पर्यंत पालखीचा पंढरपूरमध्ये मुक्काम राहील. ३ जुलै रोजी शेगावकडे पालखीचे  प्रस्थान होईल. कुरूडवाडी, भगवान बार्शी, भूम, बीड, गेवराई, जालना, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, खामगाव मार्गे २४ जुलै रोजी शेगाव पालखी पोहोचणार आहे.

Back to top button