हिंगोली : आडगाव रंजे येथे कारची दुचाकी, रिक्षाला धडक : ५ जण जखमी | पुढारी

हिंगोली : आडगाव रंजे येथे कारची दुचाकी, रिक्षाला धडक : ५ जण जखमी

आडगाव रंजे; पुढारी वृत्तसेवा : टायर फुटल्याने कारची समोरून येणाऱ्या रिक्षा आणि मोटारसायकला धडक बसली. या अपघातात रिक्षातील ५ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.९) दुपारी साडेबाराच्या सुमारास आडगाव रंजे येथील बसस्टँडजवळ घडली. जखमींना परभणी येथील रूग्णालयात दाखल केले आहे.

यााबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जवळाबाजार कडून येणाऱ्या कारचा (एमएच ३८, ७३ ५५) टायर फुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या रिक्षाला आणि मोटरसायकलला जोराची धडक दिली. यात रिक्षातील चंदू आनंद भरोसे (रा. असोला), नवनाथ साहेबराव भरोसे (रा. असोला) व ओमकार भरोसे असोला, राजू शहाणे असोला व शिवम गिरी हे सर्वजण जखमी झाले.

जखमींमधील ओमकार भरोसे या चिमुकल्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, जखमींना ग्रामस्थांनी तत्काळ खासगी वाहनाद्वारे परभणी येथे रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, ताम्र ध्वज कासले घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा 

Back to top button